मथुरा-वृंदावन दर्शन

Started by Asu@16, September 12, 2017, 07:23:49 PM

Previous topic - Next topic

Asu@16

मथुरा-वृंदावन दर्शन

तप्त गोल डोईवर
जाळी आसमंत सारा
अभिषेक सर्वांगा
घाली घामाच्या धारा

रस्तोरस्ती सत्संग
गोमातांचा निवारा
जागोजागी असे
वळू, वराहांचा दरारा

गोमये सारविली
पायाखाली वाट
शुध्दिले गोमूत्रे
असा हा थाटमाट

गंध असा दरवळतो
चहूकडे सारा
नाक बंद करवितो
खट्याळ हा वारा

भोग, झोप, सेवा
पुजाऱ्यांच्या हाती
देव झाले कैदी
झाली आयुष्याची माती

देवा धरती वेठी
केवळ पैश्यांसाठी
असा कसा राहिल
देव तुमच्या पाठी !

जंगल तोडून मानव
घेतसे सहारा
माकड, वन्यप्राणी
होती बेसहारा

जगण्याची ही लढाई
माकडे झाली हूड
छळून माणसा
घेती आयुष्याचा सूड !

मंदिरे की बंदिखाने ?
दगडांच्या मूर्ती
भक्ती नाही, भाव नाही
कसा देईल स्फूर्ती !

देव नाही मंदिरात
अंतरात त्याचा ठाव
मन ठेवा शुद्ध
तोच देवा भक्तिभाव

गोकुळात आता नाही
ऐकू येत पावा
गल्ली बोळातून वाहे
दुर्गंधित हवा

राधा गेली, कृष्ण गेला
वृंदावन झाले ओस
वैभवाच्या मथुरेचा
नाही राहिला अंश

बाकी उरले
दलाल सगळे
पोट भरण्या
सजले बगळे

काशी, मथुरा, वृंदावन
होते कधी नंदनवन
देव नाही भक्ती नाही
आता फक्त कंटकबन !
        आता फक्त कंटकबन !

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita