आयुष्य

Started by Asu@16, September 14, 2017, 10:26:57 AM

Previous topic - Next topic

Asu@16

     आयुष्य

आयुष्याच्या वळणावर
जेव्हा मी मागे वळून बघितलं
नाचत होती भुतं
आक्राळ विक्राळ रूप घेऊन
माझ्या अतृप्त इच्छांची
कोसत होती मला
शिव्या शाप देऊन
असं वांझोट सोडल्याबद्दल
अकाली गाडल्याबद्दल 
पण मी ही असहाय होतो
काळाने बलात्कार केला तेव्हा
प्रसवली ही मृत बाळे जेव्हा
माझ्या इच्छा आकांक्षांची
केले मी त्यांना आता
मनाच्या बाटलीत बंद
बघायचे पुढे आता
नव्या आकांक्षा नवीन छंद.

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita

लखन दगडे

कविता छान आहे , फार आवडली.

लखन दगडे