धन्यवाद !

Started by Asu@16, September 14, 2017, 10:27:52 PM

Previous topic - Next topic

Asu@16

   धन्यवाद !

आयुष्य माझे उसने
सर्वांचा मी देणेकरी
प्रेम तुमचे अनमोल
मोल त्याचे हृदयांतरी

चालतो तुमच्या आधारे
जीवनाचा मी वाटसरू
सावली दिली चालतांना
किंमत त्याची कशी करू

असाच असावा लोभ 
प्रेमाचा मी भुकेला
धनदौलत ना साथ देते
माणूस जातो फक्त एकला

त्रिवार वदितो धन्यवाद
शब्दांचा मी भिकारी
शब्द अपुरे, वाचा बसली
हात जोडितो, क्षमा करी !

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita