आळ

Started by शिवाजी सांगळे, September 15, 2017, 12:39:22 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आळ

चेतवतो दु:खाग्नी हा त्यावर आळ आहे
पेल्यात भरलेल्या वेदनेचाच जाळ आहे

शोधतांना इतिहास आपल्या पुर्वजांचा
समाध्यांवर फिरतो नांगरचा फाळ आहे

भाट जे झाले कराया उदो उदो एकाचा
गळा त्यांच्या स्तुती सुमनांची माळ आहे

गाजरेच आहेत स्वस्त लोकां दाखवाया
सुदिन म्हणा हा आला असा काळ आहे

सावध होऊन ऐका आता सुगंधी हाका
चौफेर आसमंतात उडते पहा राळ आहे

कितीही जरी मोठा झाला तो राजपुत्र
म्हणती अजुनही तयासी तो बाळ आहे

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९