पावसाची गम्मत

Started by शिवाजी सांगळे, September 15, 2017, 05:10:54 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पावसाची गम्मत

आभाळात झाली एकदा गंमत
आठ ते दहा ढग आले धावत

धावतानां एक जण धडपडला
दुसरा त्यावर पटकन ओरडला

छडीच घेऊन आल्या विजबाई
सर्वांनाच लागली पळायची घाई

पळता पळता सारेच ते पडले
काही जण तर मोठ्याने रडले

मला वाटलं यांना कुणी मारलं?
वरतीच का यांना टांगून ठेवलं?

लगेच मग सर्व लागले रडायला
अंगणी लागला पाऊस पडायला

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९