==* आई तुझ्या दुधाला *==

Started by SHASHIKANT SHANDILE, September 18, 2017, 01:01:37 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

आई तुझ्या दुधाला कसलेच मोल नाही
गाळले तू घाम जे रक्त म्हणवले नाही
ममतेची तुझी छाया फेकून रस्त्यावरती
रक्ताला तुझ्या आता गरज तुझीच नाही
आई तुझ्या दुधाला .........

पाजुनी रक्त केले लाळाने मोठे ज्याला
होऊनी तोच मोठा शहाणा आज झाला
नवरी चार दिसाची वैरण आई झाली
घरी सून येता ममतेस विटाळ झाला
आई तुझ्या दुधाला .........

किंमत दुधाची विसरुन तो भाळला रुपाला
म्हणताच बायकोने लात मारली घराला
केले होते मुलावर अन्याय का मातेने
पाठवली मरता खेपी आई वृद्धाश्रमाला
आई तुझ्या दुधाला .........

आईने का करावी मरमर मुलांसाठी
म्हातारपणी मुलांची ती आस कश्यासाठी
भेटीत जेव्हा अश्रू मिळणार त्या आईला
आईने का करावे सांभाळ रडण्यासाठी
आई तुझ्या दुधाला .........
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्र.९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!