विरहाचा डोह

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, September 19, 2017, 06:51:36 AM

Previous topic - Next topic
विरहाच्या डोहात डुंबलेल्या
मनाची तार जरा झटकुन पाहिली

ओल्या झालेल्या त्या मनातुन आज ही
यातनेची ती धार ओघळतांना दिसली

अश्रूंचा बांध फुटला अन ओघळणार्या
अश्रू थेंबात तुला वाहतांना मी पाहिली

विसरून तू जाशील मज
आता हिचं पूर्ण शास्वती झाली

त्या यातनेच तरी कुठं चुकलं
तूझ प्रेम तू अधुरच होत दिलं

तिनंही त्या वेळी साथ दिली
जेव्हा तू मज होती सोडून गेली

मार्ग तो दिसला अन पुन्हा सरणावरच्या
बिछान्यावर जाण्याची पायरी दिसली

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर