मोठ्ठा पाऊस

Started by smadye, September 20, 2017, 05:48:50 PM

Previous topic - Next topic

smadye

मोठ्ठा पाऊस

पाउसा पाउसा किती पडशील
दमले ढग हे आता किती रडवशील
वीज पण सारखी चमकू लागली
ढगांच्या गडगडाटात भीती वाटली

नाले भरभरून वाहू लागले
रस्ते सारे पाण्याने भरले
वाहतूक झाली आहे ठप्प
काहि नाही कळत आंम्ही झालो गप्प

बाळ घरी आणि आईबाबा ऑफिसात
बाळाकडे येऊ नाही शकत
आईबाबांची ओढ बाळाकडे
कधी घेऊ बाळाला कुशीत हे एक कोडे

एकीकडे आहेत वृद्ध आईबाबा
लेक पाऊसात अडकला परिस्थितीवर नाही ताबा
म्हातारे बसले घरी एकटे
सारे लक्ष्य पोराच्या वाटेकडे

रस्यावर कित्येकांचे घर आहे रे
पाणी आले घरात, कसे सावरू रे
थंडीत कुडकुडतो सारा परिवार रे
काय खाऊ कसे राहू समजत नाही रे

खड्डे आणि नाले एक झाले
वाटेत चालताना पाय अडखळले
एकदा सुखरूप घरी जाऊंदे
मग हवे तितके पड, आता जरा थांब रे

पावसा जरा तू आवर घे
उन्हाचे कवडसे मला पाहू दे
पावसा पावसा थांब रे
तुला देतो पैस, तू जरा आराम कर रे

             सौ सुप्रिया समीर मडये
madyesupriya@gmail.com