पाऊस कधीचा कोसळतो !

Started by Asu@16, September 20, 2017, 05:59:34 PM

Previous topic - Next topic

Asu@16

पाऊस कधीचा कोसळतो !

          पाऊस कधीचा कोसळतो !
क्रोध भयंकर शंकर प्रलयंकर
तांडव जणू का हे करतो,
          पाऊस कधीचा कोसळतो !
व्यथित होऊन वसुंधरेचा
आत्मा का हे अश्रू ढाळतो,
          पाऊस कधीचा कोसळतो !
सुरासुरांच्या नित्य लढाईत
इंद्र मेघांनी का आक्रमितो,
          पाऊस कधीचा कोसळतो !
नैतिकतेचा बांध फुटुनि
पापांचा का पूर येतो,
          पाऊस कधीचा कोसळतो !
सत्तेचा मदमस्त कुंजर
जनीं काननीं का उधळतो,
          पाऊस कधीचा कोसळतो !
निसर्ग नियम मोडून केल्या
कृत्यांवर का पाणी फिरवितो,
          पाऊस कधीचा कोसळतो !
गर्जत बरसत कडकडाट ओरडत
मानवा का ताकीद देतो,
          पाऊस कधीचा कोसळतो !
पापाग्नीने धरतीवरल्या
स्वर्ग नभीचा का ओघळतो,
          पाऊस कधीचा कोसळतो !

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita