प्रतीक्षा......?

Started by Ashok_rokade24, September 23, 2017, 12:33:19 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

वर्षा मागून वर्ष सरले ,
काळही गेला पुढे ,
आजही मी ऊभा एकला ,
नजर वाटे कडे , 

मधूर बोलणे गोड हासणे ,
नजरेत प्रेम भरले ,
जादू तूझ्या स्पर्शाची अशी ,
जीवन बहरले ,

साद सुमधूर ऐकण्या ,
कर्ण आतूरले ,
वाट तूझी पहाता पहाता ,
नयनही शिणले ,

गारांची बरसात त्या सम ,
दु:खे नीत नवी ,
उरी भरल्या वेदनांना
फुंकर तुझी हवी ,

वाट तुझी पहात राहील,
साथीला आठवणी ,
मृत्यूने जरी गाठीले मज ,
दिसेल याच ठीकाणी ,

                         अशोक मु. रोकडे.
                           मुंबई.