नातं

Started by sneha31, September 25, 2017, 10:39:49 AM

Previous topic - Next topic

sneha31


लोकांच्या गर्दित फार झाली हो घुसमट
माणुसकिच विसरलेत तर काय असणार किस्मत
नात्यांची जाणीवच उरलेली नाही
आठवण तर दुरच हल्ली वेळही मिळत नाही

घरा बाहेर पडतांना परत मागे वळुन बघतो
काही राहिलेल तर नाही ना बघ एकदा
रोजच्या घाई गडबडीत सर्वच राहुन गेल
चार भिंतीतल्या नात्यांनाही विसरुन गेल

हळुहळु आपुलकीच संपत चालली
माणुसकी सोडुन फक्त गरजच उरली
नष्ट होत चाल्ल्यात मानव जाती
विरघळत चालले जवळच्याच नाती
स्नेहा माटुरकर