मनात आलेलं

Started by @गोविंदराज@, September 25, 2017, 12:06:06 PM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

तुझी आठवण येतंच नाही म्हणावं तरी,
एवढंच कळावं कि आहेस का तू बरी?
खूप शोधले बहाणे तुला विसरण्याचे,
तू होतीस मनात खोलवर रुजलेली जरी...

तु तशी मजेतच असशील याची खात्री आहे,
तुझ्यातून फक्त मलाच तेवढी कात्री आहे...
हरकत नसुन मनाची हि घालमेल आहे,
रंगमंचावर माझं नाटकच एकपात्री आहे...

तुझी सोबत मिळाली नसतीच हे सत्य आहे,
खरं खोटं शोधण्यात आता काय तथ्य आहे...
जे समोर आलं ते मी स्वीकारलं कि तुला हवं होत ते,
या भ्रमाचं जणू मला आता पथ्य आहे...

त्रास होतंच नाही असं मी म्हणत नाही,
पण माझा त्रास मी कुणालाच सांगत नाही...
माझी व्यथा मी शब्दात मांडली एवढंच,
तुला कधी मी याची दाद मागत नाही...

......@ गोविंदराज @
       २५/०९/२०१७