गार्‍हाणे

Started by Asu@16, September 28, 2017, 07:54:10 PM

Previous topic - Next topic

Asu@16

              गार्‍हाणे

वाट लागली देवी । वाट लागली ।।
वाट लागली देवी । वाट लागली ।।
अशी कशी जगण्याची वाट लागली ।
वाट लागली देवी । वाट लागली ।।
वाट लागली देवी । वाट लागली ।।

पावसाबरोबर आकाशातून खड्डे पडती
तेच तेच खड्डे पठ्ठे बुजती
पैशाने ठेकेदारांची पोटं भरती
खड्डयांपाई रस्त्यांची वाट लागली

वाट लागली देवी । वाट लागली ।।
वाट लागली देवी । वाट लागली ।।
अशी कशी रस्त्यांची वाट लागली
वाट लागली देवी । वाट लागली ।।
वाट लागली देवी । वाट लागली ।।

कर्जाच्या बोजाने बाई खचली
शेतकऱ्यांना मरणाची घाई लागली
फासावर जाण्याची वाट धरली
कर्जापायी शेतकऱ्यांची वाट लागली

वाट लागली देवी । वाट लागली ।।
वाट लागली देवी । वाट लागली ।।
अशी कशी शेतकऱ्यांची वाट लागली
वाट लागली देवी । वाट लागली ।।
वाट लागली देवी । वाट लागली ।।

गरिबांची दिवसेंदिवस पाठ वाकली
हाती नाही काम, गुंडांची वट वाढली 
घरी नाही दाम, ताटं नाही वाढली
पैशांपाई गरीबांची वाट लागली

वाट लागली देवी । वाट लागली ।।
वाट लागली देवी । वाट लागली ।।
अशी कशी गरिबांची वाट लागली
वाट लागली देवी । वाट लागली ।।
वाट लागली देवी । वाट लागली ।।

जगण्याची थोडी थोडी भिती वाटली
न बोलताही उन्हात थंडी किती वाजली
भविष्यावर जगण्याची लाट फुटली
भितीपायी माणसांची वाट लागली

वाट लागली देवी । वाट लागली ।।
वाट लागली देवी । वाट लागली ।।
अशी कशी माणसांची वाट लागली
वाट लागली देवी । वाट लागली ।।
वाट लागली देवी । वाट लागली ।।

उद्याची वाट पहात झोप लागली
स्वप्नांची दुनिया मोप छान वाटली
उठत्या पडत्या देशाला तीट लागली
स्वप्नांपाई उद्याची पहाट फुटली

पहाट फुटली देवी । पहाट फुटली  ।।
पहाट फुटली देवी । पहाट फुटली  ।।
अशी अशी उद्याची पहाट फुटली 
पहाट फुटली देवी । पहाट फुटली  ।।
पहाट फुटली देवी । पहाट फुटली  ।।

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita