सरणावर माझ्या

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, September 29, 2017, 10:23:12 AM

Previous topic - Next topic
येऊन जरा सरणावर माझ्या
एक प्रेमाचं फुल वाहशील का
अश्रूंच्या त्या दोन थेंबान
प्रेत माझं जाळशील का

श्वास जरी चालू राहिला शेवटच्या
क्षणी नाकात कापूस घालशील का
तीळ तिळ जळेल जेव्हा शरीर माझं
सरणावर तुपाचा दिवा लावशील का

कोणी जरी रडतांना दिसलं नाही तुला
जीवनातून कायमचं ब्लॉक करशील का
जेव्हा जळेल प्रेत माझं आत्म्याच्या
शांतीसाठी मागे वळून पाहशील का

जेव्हा घरी जाशील तुझ्या
एकदा माझा फोटो हातात घेशील का
आत्मा भरकटू नाही म्हणून
त्याचा साखर चुंबन घेशील का

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील)
मो.9637040900.अहमदनगर

Sanju.....