अफवेचे बळी

Started by sharad Halde, September 29, 2017, 04:53:56 PM

Previous topic - Next topic

sharad Halde

बघा काय जोरदार मंत्र्याच काम चाललंय
रक्ताळलेल्या ह्रूदयांना पाच लाखांच मलम लावलय

म्हणे उच्च दर्जाचे चौकशीचे आदेश दिलेत
कारण निव्वळ अफवेने लोक मेलेत

अरे कसे कळेना त्या जून्या ब्रीजवर लोकांना विश्वास नव्हता
अन गर्दीला तर तो मूळीच पूरेसा नव्हता

असो मंताची गर्दी बघणार्याना माणसांची गर्दी नाय दिसायची
आम्हाला तर उद्यापासून तीच रक्ताळलेली वाट आहे तूडवायची




शरद हळदे