अग बकुळा .....

Started by sanjay limbaji bansode, September 29, 2017, 06:34:13 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode





माणूस मी हाय ग भोळा

लागना,  रातीला डोळा

अग बकुळा .....

लागलाय तुझा लळा

ग झालो येडा खुळा ॥




दाण्यानं कणसं भरली ग

जमीन खोलवर मुरली ग

टिपण्या झाली पाखरं गोळा

वाऱ्यावर उड़ पालापाचोळा

अग बकुळा ......

लागलाय तुझा लळा

ग झालो येडा खुळा ॥







लाललाल झाली टमाटर

काढाया आली या मटर ।

धर ग हाती आता विळा

सवंगू सारा आपला मळा

अग बकुळा.....

लागलाय तुझा लळा

ग झालोय येडा खुळा ॥




संजय लिंबाजी बनसोडे
sanjaylbansode.blogspot.com