फार झाले

Started by शिवाजी सांगळे, October 04, 2017, 09:58:31 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

फार झाले

जगलो येथे आजवर फार झाले
वैर ना सुखाशी दु:ख यार झाले

गुपित यारीचे सांंगु कसे कुणाला
इशारे असे नजरेत चार झाले

निजले पुस्तकात जे त्यागी होते
लुट करतेच इथे बेसुमार झाले

झालेत किती उद्रेक भावनांचे
पानावरी अळवाच्या भार झाले

ताब्यात जीव येथल्या यंत्रणेच्या
जगणे का आता हे उधार झाले?

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९