नेहमीचं तुझं गप्प बसणं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, October 08, 2017, 07:12:53 AM

Previous topic - Next topic
काय कारण असत तुझं
अस नेहमीचं गप्प बसण्याचं
मला कधीचं न कळल
तुझ्या या खोट्या बहाण्याचं

रोजचं मोबाईल पाहतोय
मी तुझा मेसेज येईल
कधीच न सुटनाऱ्या खोट्या कोड्यात
माझा पूर्ण दिवस असाच जाईल

डोलणाऱ्या मोगऱ्याच्या फुलांपरी
तु कधी सुंगधीत दरवळ करशील
माझ्या या अबोल चेहऱ्यावरचं
प्रेम कधी तू स्वीकारशील

मोबाईलची रिंग वाजली तरी
हृदय धडधडू लागतं
तू दिसत नाहीस कुठेही तरी
तुला मोकळ्या वाटेवर शोधू पाहतं

विस्कटलेल्या मोकळ्या केसांत
मी दिलेला गुलाब आजही खुलून दिसेल
का कोणास ठाऊक तो गुलाब ही
तुझ्या खोट्या प्रेमाचा साक्षीदार असेल

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील)
मो.9637040900.अहमदनगर

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]