Friendship kavita

Started by drsandhyaanvekar, October 08, 2017, 05:42:02 PM

Previous topic - Next topic

drsandhyaanvekar

स्नेहाचे रोपटे

बालपणी लावलेले स्नेहाचे रोपटे,
आकाशी कधी पोचले,  कळालेच नाही.

भावनांच्या वाऱ्यासंगे डोलत डोलत,
आठवणींची पानें कधी हिरवळली,   जाणवलेच नाही.

थोडी पानें गळली, थोडी उडून गेली.
जी काही राहिली, ती रोपास बांधली गेली.
थोड्या पानांना सुंदर फुलें फुटली,
ती नेहमी ताजीतवानी दिसली.

स्नेहाचे काही बंध त्याच्या पारंब्या झाल्यां,
त्यांसंगे झोकें घेता जीव माझा सुखावला.

ह्या रोपट्यात आहे  'मीपण' माझे दडलेले,
ह्या बुंध्यात  आहेत ते न्यारे क्षण  लपलेले,
ज्यात गुपित आहे, माझे बालपण सारे.

मी 'मला' च हरवलेल्या वेळीं
वाटा साऱ्या अनोळखी दिसल्या.
स्नेहाच्या छायेखाली मात्र नेहमी
संबंध्यांच्या ओळखी पाहिल्या..

मैत्रिच्या सांवलितून आपुलकीच्या छायेखाली,
मी नेहमी पानांतून  कवडसा शोधत राहिले.

जगाच्या  चटक्याने माझे मन जेव्हा लासले,
स्नेहाच्या ओलाव्याने  पुन्हा ते विसावले.
संसाराच्या धगीत जेव्हा मनाला ग्लानी आली,
ह्या रोपानेच तेव्हा आपुलकीची मोहिनी घातली.

आज स्नेहाचे रोप उंच गगनी झेपले.
त्याचें अनेक अंकुर  रोमारोमांत फुलले.
मैत्रीचे विविध पंख चहु दिशांना पसरले.
त्याच्यारुपे जीवनात नवीन सूर लाभले.

जुन्या पानांवर फिरून हिरवळ पालवी दिसली.
बालवयाची सलगी आता खोलवर काळजात घुसली.

(संध्या राजन्)

Shrikant R. Deshmane

जगाच्या  चटक्याने माझे मन जेव्हा लासले,
स्नेहाच्या ओलाव्याने  पुन्हा ते विसावले.
संसाराच्या धगीत जेव्हा मनाला ग्लानी आली,
ह्या रोपानेच तेव्हा आपुलकीची मोहिनी घातली.

khup chan sandhya  ji
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

drsandhyaanvekar

धन्यवाद, श्रीकान्त!