देई रे दातारा

Started by विक्रांत, October 08, 2017, 08:23:30 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

 देई रे दातारा
************
देई रे दातारा
मागतो ते मला
मग तू वाटेला
लाव पुन्हा ।
किती फसवसी
किती ठकविसी
येता मी दाराशी
घालविसी ।
काय मी मागतो
धनमान यश
जाणतो तो पाश
मोहमयी |
करी रे विरागी
विषय मोडून
टाक रे फाडून
मनोपट |
तृष्णेची इवली
जळो मुळे सारी
कर रे आंधळी
दृष्टी जगा |
देह कवतुक
मनाचे लालन
अहम संगोपन
करू नको |
ऐक रे विनंती
देई तव प्रीती
अविरत स्मृती
मनामाजी ।
ज्ञान भक्ति विना
येऊ नये चित्ती
विक्रांतची मती
होवो दत्त ।
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे १ ऑक्टोबर, २०१७
http://kavitesathikavita.blogdpot.in