विझलेल्या प्रार्थना

Started by विक्रांत, October 08, 2017, 08:31:52 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

विझलेल्या प्रार्थना
***************
विझलेल्या प्रार्थनांचा दिवा हृदयात आहे
मोजले ना चालणे मी  वाट पाऊलांत आहे

आश्वासन प्रकाशाचे घेऊन जरी रात आहे
हरवला धीर माझा तम काळजात आहे

शोधतो अस्तित्वखुणा ज्ञातही अज्ञात आहे
मानलेली गृहितके मनाची पळवाट आहे

पुन्हा रिते नभ माझे आधार सुटत आहे
सुन्न संवेदना साऱ्या शून्य घनदाट आहे

कसे सांगू कर कृपा मेघा तू आडात आहे
वर खाली होते दोरी जन्म पोहऱ्यात आहे

तसाही विक्रांत आता मानलेली बात आहे
उरलेले शब्द काही उगा रेंगाळत  आहे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot .in