रांग

Started by शिवाजी सांगळे, October 08, 2017, 09:34:06 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

रांग

आयुष्य एक रांग
जन्मा पासून सुरू झालेली,
शेवट ज्ञात असलेली,
शिस्तबद्ध राहण्या
वाचून पर्याय नसलेली...!
सुख दु:खाचे अवरोध
म्हणा किंवा गतिरोधक...!
थांबावं आणि चालावं
लागतच...!
ईच्छा असो वा नसो
अगोदरच
नक्की झालेला प्रवास
कसलीही घाई न करता
फक्त आपण करायचा...!
केवळ ध्यानात ठेवायचं...
काम क्रोध लोभ
मोह मद मत्सर
यांची
शिस्त पाळणं...
चांगल्या प्रवास साठी...!

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९