शरद पौर्णिमा

Started by Asu@16, October 08, 2017, 10:32:46 PM

Previous topic - Next topic

Asu@16

   शरद पौर्णिमा

क्षीरसागरी स्वच्छंद पोहुनि
चंद्र झालाय वेडा
धुंदफुंद नभी घालतो
धवल दुधाचा सडा
बासुंदीचे पाट धरतो
रात्र जागुनि खुळा
नभाच्या अंगणी फुलवि
चांदण्यांचा मळा
दुग्धशर्करा योग होता
उधाण ये प्रीतीला
प्रियासंगे संग रंगता
सुगंध ये रातीला
शब्द शब्द मिटता
भाव झाला मोकळा
शृंगार असा रातीला
कणाकणात झोकला
पाहुनि जगी प्रणयबहार
उधाण येई सागरा
प्रणयधुंद रात सरता
जाग येई पाखरां
शांत वारे, शांत तारे
आकाशही शांत झाले
प्रणयाचा बहर सरूनि
त्रिभुवन सारे क्लांत झाले

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita