जिंकणं'

Started by suryawanshirohit28, October 08, 2017, 11:27:13 PM

Previous topic - Next topic

suryawanshirohit28

"शर्यत अजून संपली  नाही , कारण मी अजून  जिंकलो नाही  " या ओळी  कानावर आल्या आणि मन या "जिंकण्याचा " अर्थ शोधू लागलं . काय असत 'जिंकणं'

जिंकणं  म्हणजे नेमकं काय असतं ?

कशाचीहि पर्वा न करता
प्रसिद्धीच्या दिशेकडे  बेफान पळत सुटण  असतं ,
कि कुणाच्या यशात छोटासा भाग होऊन त्याला
सोबत घेऊन चालण  असतं.

जिंकणं  म्हणजे नक्की काय असतं ?
यशाच्या  नशेने धुंद होऊन बुद्धिजीवी होणं असतं ,
कि एखाद्या विषयाचीच नशा स्वतःमध्ये बाळगणं असतं.

जिंकणं  म्हणजे नक्की काय असतं ?
उपदेश म्हणून दिलेल्या सूचनांना तंतोतंत पाळण असतं,
कि स्वतःच्या हक्कांसाठी स्वतःच प्रयत्न करणं असतं.

जिंकणं  म्हणजे नक्की काय असतं ?
स्वतःला फक्त जिंकण्याची सवय लावणं असतं,
कि आलेल्या अपयशातून  पुन्हा नव्याने जिंकण्याचा निर्धार कारण असतं.

जिंकणं  म्हणजे नक्की काय असतं ?
आकाशात भरारी घेऊन उंच उडण असतं,
कि उंच उडतांना  हि पाय जमिनीवर ठेवणं असतं.

खरंच हे जिंकणं  म्हणजे नक्की काय असतं  !


रोहित सूर्यवंशी
नाशिक
9767717036
रोहित  सूर्यवंशी  , नाशिक
9767717036

Shrikant R. Deshmane

kya baat rohitji...
khup chan vichar ahe..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

suryawanshirohit28

रोहित  सूर्यवंशी  , नाशिक
9767717036