जाळला जात होतो

Started by शिवाजी सांगळे, October 10, 2017, 03:56:34 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

जाळला जात होतो

माझेच अस्तित्व मी विसरू पहात होतो
ध्यानात उगाच मी कुणाच्या रहात होतो

भाग्यवान ना ईतुका चरणी ईश्वराच्या
ह्रदयस्थ  देवाच्या  कंठी  हारात होतो

नसतांना वादात मी कधी कोणाच्याही
उगा शंका दंग्यात कुणाच्या साथ होतो

निरांजनात जळता वातीस खेद नव्हता
मंद  मांगल्याने जाळला मी जात होतो

हरवुनी जरी  गेले  स्वर सुरावटी मधले
गीत  जीवनाचे  मस्तीत मी  गात होतो

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९