निभवा दोस्ती

Started by शिवाजी सांगळे, October 10, 2017, 04:00:16 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

निभवा दोस्ती

सांगून का करतात कोणी वार येथे
बोलून गोड चिरतात गळे फार येथे

सोडता का रे पुडी ती आश्वासनांची
बोलतां खोटे हो स्वर जोरदार येथे

त्यागुन आपले जो चाले आम्हा संगे
निष्ठावानां मिळे बंगला कार येथे

कष्टुन सुद्धा न मिळे पगार वेळेवरी
हुजऱ्यासी होतोय प्राप्त सत्कार येथे

तडजोडीच्या खेळात जिंकून देखील
वाट्यास तुमच्या येते पहा हार येथे

कालचा वैरीही होतो दोस्त आजला
निभवाच दोस्ती दुश्मनीचे सार येथे

विचारता काय करतो पागेत येथल्या
लागलीच होतो घोड्यावर स्वार येथे

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९