गाव बदलतय

Started by sharad Halde, October 10, 2017, 04:24:16 PM

Previous topic - Next topic

sharad Halde

कूंपण ही आता  प्रगती करतय
हळूहळू ते ही पूढे सरकतय

ओसाड होत इतकी वर्षं रान
आज ते सातबारा शोधतय

खूप झाले शहाराचे व्यवहार
गाव ही आता रंग बदलतय

बैल विकून टाकले कसायाला
नांगर कूदळ आता गंज खातय

विसरून गेल होत जे घर दार
ते ही आता रक्ताच नातं सांगतय

   शरद हळदे