बाकी काही मागणं नाही तुला

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, October 12, 2017, 09:56:10 AM

Previous topic - Next topic
खूप काही केलं तुझ्यासाठी
एकदा माझ्यासाठी वेळ देऊन बघ
बाकी काही मागणं नाही तुला
एकदा प्रेमानं बोलून बघ

हृदय माझं धस्स झालं आता
एकदा त्याला खरंच सावरून बघ
बाकी काही मागणं नाही तुला
एकदा प्रेमानं हृदयातलं जाणून बघ

रातीच्या त्या काळ्या कुट्ट अंधारात
एकदा वाट माझी पाहून बघ
बाकी काही मागणं नाही तुला
एकदा प्रेमानं सोबतीला चालून बघ

नशिबानं ही साथ माझी सोडली
एकदा तू माझं नशिब होऊन बघ
बाकी काही मागणं नाही तुला जीवनाचा
एकदा प्रेमानं सारीपाट खेळून बघ

रोजचं यातना सोसतो मी
एकदा माझ्या सारख सोसून बघ
बाकी काही मागणं नाही तुला
एकदा प्रेमानं विरह यातनेत जगून बघ

रोजचं अस्थ्या जात्यात माझ्या नदीला
एकदा अस्थ्या माझ्या वेचून बघ
बाकी काही मागणं नाही तुला
एकदा प्रेमातं खरंच मरून बघ


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]