सांग ना

Started by शिवाजी सांगळे, October 12, 2017, 03:03:09 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सांग ना

किती करतोस प्रश्न तू रे जीवना ?
उत्तर अबोल्या मधले तू जाण ना

लावूनी बसलो आस मी तुजकडे
करू किती सांग तू प्रेमळ याचना

प्रकाशल्या नभात येथल्या तारका
फिरू नको  मागे गडे  तू  थांब ना

असह्य होतो  मुक  संवाद पावसा
कोसळता  काही  तरी तू बोल ना

सोसलेत किती ऋतू सुख दुःखांचे
भेटण्यास फिरून पुन्हा तू येच ना

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९