खोटं प्रेम तुझं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, October 13, 2017, 06:17:16 PM

Previous topic - Next topic
मी का करू तुझ्या
खोट्या आसवांची अपेक्षा
मला कधी दिलीच नाही
तू खऱ्या प्रेमाची भिक्षा

आसवांनाही कळून चुकले
पापण्यांना पाशी येऊनी थांबले
नेहमीच आठवून तुला
हुंदके ही मधेच थबकले

उपेक्षा करायची होती
तर का अशी केलीस
जीवनाच्या या बंधनात
तू न बोलता परकी झालीस

उशिरा का व्हायना तू मला
चांगलीच अद्दल घडवलीस
नजरे समोर तुला सजवणारा मी
आज चांगलीचं वाट दाखवलीस

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर