ओढ

Started by maddy pathan, October 14, 2017, 12:00:31 AM

Previous topic - Next topic

maddy pathan

न बोलल्या शब्दातून सारं काही कळत होतं
गुपित त्याच्या मनातलं चेहऱ्यावर मला दिसत होतं,

कोणीच नव्हते मी त्याची अन तो ही माझा
कोणीच नाही तरीही ओढ मनातली
काही केल्या सुटत नाही,

कळत होतं मला सगळं जाणून काही घ्यायचं नव्हतं
आमच्या गोड नात्याला नाव मला दयायचं नव्हतं,

तिच्या विराहमध्ये काही ओळी आठवल्या
धुंद गंधातल्या सरी या पाण्यासवे बरसल्या
आज माझ्या आसवांनी पापण्या ओलावल्या,

सर येताच पावसाची आठवणी साऱ्या गवसल्या
आठवणींच्या देशात माझ्या आसवांद्वारे सावणधारा बरसल्या.....
          *लेखक-कवी आराधना*

Shrikant R. Deshmane

न बोलल्या शब्दातून सारं काही कळत होतं
गुपित त्याच्या मनातलं चेहऱ्यावर मला दिसत होतं,

chan...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]