शब्द

Started by maddy pathan, October 14, 2017, 12:09:57 AM

Previous topic - Next topic

maddy pathan

*शब्द*

जे शब्दांनी न बोलले कधी मी
ते डोळ्यांनी तू जाणून घे,
आस माझ्या अंतरीतली
आज तू ओळखून घे,

जे शब्दांनी न बोलले कधी मी
ते डोळ्यांनी तू जाणून घे,
नकळत्या होणाऱ्या स्पर्शाचा अर्थ तू
उलगडून घे

जे शब्दांनी न बोलले कधी मी
ते डोळ्यांनी तू जाणून घे,
स्वप्न हे सत्यात माझे आज मला जाणून दे

जे शब्दांनी न बोलले कधी मी
ते डोळ्यांनी तू जाणून घे,
आसवांची ओंजळ माझ्या सुखांनी तुझ्या उजळू दे

जे शब्दांनी न बोलले कधी मी
ते डोळ्यांनी तू जाणून घे,
आहे चार क्षणाच जीवन माझं
या जगा पलीकडे तुझ्यासवे जगू दे........

जे शब्दांनी न बोलले कधी मी
ते डोळ्यांनी तू जाणून घे..........
       *लेखक-कवी आराधना*

Shrikant R. Deshmane

survat khup chan aahe
mastach
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]