चिरसहारा

Started by Asu@16, October 15, 2017, 07:28:05 PM

Previous topic - Next topic

Asu@16

         चिरसहारा

विशाल हृदया तुझ्या विसरलो
पाय ठेविला उरावरी.
थकलो थकलो, रिती ओंजळी
नाही सहारा दिला कुणी
लुटता, पडता आणि मिटता
झेलुन घेशी तुझ्या अंगणी
उरी भेटलो, मृण्मय झालो
अपराधी मी आलो घरा
सरले अश्रू, सरली भ्रांती
देई मला चिरसहारा

- अरूण सु.पाटील
(अनुराग फेब्रुवारी १९८५ मध्ये 'हृदय' या नावाने प्रसिद्ध)

https://www.facebook.com/AsuChyaKavita