रेशीमगाठी

Started by sitaramdhepe, October 16, 2017, 12:40:23 PM

Previous topic - Next topic

sitaramdhepe

तिरकी नजर भिडली जेव्हा
निःशब्द झाले मी सख्या..
मळभ दाटले एकाच क्षणी
"विरहाचे"
भेदले काळजाला पुराने वारे,
ऊनाड जे होते..
कापरलेल्या पापण्यां,
गुमानं काही छेडूनी गेल्या..
सुचेनासे झाले काहीसे
एक-एक ठोका मोजताना..
कानात काही कुजबुजून गेले,
तुझे ते अल्लड चाळे..
गुंफली पुन्हा जुनी माळ
बेभान मस्तीची..
वात्रटांगत फिरणं..खाणं
रुसुन फुगणं
अगदी
कुठेही घट्ट मिठी मारणं
हातात हात घेऊन
ऊगाच चोळत बसणं
लुप्त झालेल्या भावनांना
पार पिंजून काढल्या
श्वासातल्या
"गरम" लहरींनी..
शिंतरलेल्या अत्तरासम
सुगंधी आठवणी शिरकावल्या
भुलवलेल्या"रेशीमगाठी"
पुन्हा आज ऊसवल्या


- कवी सिताराम ढेपे.

Shrikant R. Deshmane

शिंतरलेल्या अत्तरासम
सुगंधी आठवणी शिरकावल्या
भुलवलेल्या"रेशीमगाठी"
पुन्हा आज ऊसवल्या

chan sitaram ji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]