दिवाळी

Started by Asu@16, October 17, 2017, 03:47:46 PM

Previous topic - Next topic

Asu@16

          दिवाळी

सुखसमृद्धी 'अच्छे दिन' येवो
दुखदारिद्रयाचा तिमिर जावो
जो जे वांछिल तो ते लाहो
दीप प्रगतीचा उजळत राहो
हसत नाचत दिवाळी येवो
दीनदुबळ्यांना शक्ती देवो
गोरगरिबांना अन्न देवो
अंधश्रद्धांना बुद्धी देवो
धर्मातून अधर्म जावो
दुष्टांचा संहार होवो
आनंदाचा पूर येवो
कळकट मळकट वाहून जावो
दिवाळी दिवाळी प्रकाश देवो
प्रकाशासाठी दिवा देवो
दिव्यासाठी तेल देवो
तेलासाठी पैसा देवो
पैशासाठी काम देवो
कामासाठी बुद्धी देवो
बुध्दिमध्ये सुविचार देवो
विचारांनुसार आचार देवो
आचारांसाठी घरदार देवो
घरादारासाठी   देश   देवो
देशासाठी संस्कृती  देवो
संस्कृतीतून विकृती नेवो
वसुधैव कुटुंबकम् गावो
जगी भूतां शांती राहो
प्रकाश एवढा देऊन जा
अंधार सगळा घेऊन जा
दिवाळी दिवाळी येऊन जा
लाडू चकल्या खाऊन जा

-अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita