उमजले का कुणाला

Started by शिवाजी सांगळे, October 17, 2017, 11:13:35 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

उमजले का कुणाला

वास्तव कसे जगावे, समजले का कुणाला
स्वप्नात रमुन जाणे, उमजले का कुणाला

मनाशी संवाद हो, मनाचा असे नाही
करूनी यत्न सारे, साधले का कुणाला

असावेच जीवनात, स्वप्नीचे सुख सारे
वाटूनही मना ते, लाभले का कुणाला

कारण झालो आम्ही, बिथरावया ऋतूनां
प्रदूषण का वाढले, बोलले का कुणाला

आहे तडजोड फक्त, सर्वांचेच आयुष्य
सारेच सुख येथले, सोसले का कुणाला

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Atul Kaviraje

 शिवाजी सर, "उमजले का कुणाला", या कवितेतून आपण, जगणे ही संकल्पना अतिशय उत्कृष्ट रित्या मांडली आहे. स्वप्न, मन, ऋतू, आयुष्य या जगण्याशी निगडित गोष्टींचा, विशेषणांसह, वानगी-दाखल असा अत्यंत मार्मिकरित्या वापर केला आहे.

     ही फक्त तडजोड आहे, असे अंतिम ओळींमध्ये सांगून , सत्य विदित करून, आपण जीवनाचे खरे स्वरूप प्रकर्षाने दाखविले आहे. पाघळ ना लावता अचूक आणि वेधक कडवी आपण चपखलपणे योग्य  रीतीने या कवितेत बसवली आहेत. कवितेच्या आपल्या पुढील प्रवासास माझ्या हार्दिक शुभेच्छा.

     जीवनात घडणाऱ्या काही गोष्टींचे
     आकलन होत असते कधी-कधी
     न  उमजणाऱ्या, आकलन -बाह्य
     दृष्टी-आड करावे लागते कधी-कधी.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-३०.०५.२०२१-रविवार.