कौशल्य

Started by कदम, October 23, 2017, 07:50:51 PM

Previous topic - Next topic

कदम


परत एकदा स्वतःलाच पारखून घेतो
परत एकदा स्वतःलाच ओळखून घेतो

भावगर्दीत स्वतःला कुणाशीतरी तोलतो
परत एकदा स्वतःलाच ओळखून घेतो

व्यक्तीमत्व स्वतःचेच निरखुन घेतो
परत एकदा स्वत्वासाठी झोकून देतो

जगतो आहे जे जीवन ते न्याहाळून घेतो
परत एकदा जीवनासाठी आजमावून घेतो

कौशल्य जगण्याचे परत पडताळुन घेतो
परत एकदा कौशल्य जीवनाचे शिकून घेतो

Shrikant R. Deshmane

सुरवात आणि शेवट खूप छान झाला कवितेचा
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]