क्षण

Started by sumedh thool, October 23, 2017, 08:16:39 PM

Previous topic - Next topic

sumedh thool

क्षण

पापणीतले प्रेम असते
थोड़े गोड पण जास्तच कडू असते
त्या ठिकाणी मन घेउन जातो
जिथे घालवलेले क्षण असते
दुःख किती रे या छोट्याश्या आयुष्यात
मन रडत जाते
आपण सांत्वन देत जातो
किती म्हणाव त्या आतुरतेला
सर्व सोसून घेते
जीव लावतोय आपण ज्यांच्याकरता
कदर त्यांना मुळीच नसते
शब्दानी शब्द रेखाटले जातात
व्यक्तिचित्र धुंद पड़ते
अश्या काळोख्यात एकटं वाटू लागते
जीवन आपल्याला बेवारस वाटू लागते
या प्रवासात जिंकायचं तरी कसं
कारण त्यामध्ये आपली मंझिलच नसते
आनंद आपल्यावरच हसत असतो
कुठे तरी त्याला भारुड पडलेली असते
या अश्या जीवनात सांग सोनेरी किरण एक क्षणाचा मोह असतो
डूबत्याला तिन्क्याचा सहारा हवा असतो
दुखाला दुखातून जिंकता येते
जीवन इथेच कळता येते
या भवरयात अडकतात बरेचसे झण
कारण त्यानापण आठवतात ते घालवलेले क्षण

सुमेध थूल