चल मडकं फोडू जातीचं

Started by sanjay limbaji bansode, October 24, 2017, 02:11:06 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

चल मडकं फोडू जातीचं

या दळभद्ऱ्या मातीचं ॥




हा छूआ छूतीचा तांडव

मोडू जातीवादी  मांडव




मानवतेचं पेरू बियाणं

ऊगवु समता या रानानं




तेल आटवू   वातीचं

या दळभद्ऱ्या मातीचं ॥




यानी द्वेष मनी राखला

जाती वादानं माखला




उचलू त्याला साफ करू

हेवे देवे सारे माफ करू




स्वप्न जाळू काळ्या रातीचं

या  दळभद्ऱ्या मातीचं ॥




sanjay limbaji bansode

9819444028