बरं झालं

Started by कदम, October 25, 2017, 09:03:57 PM

Previous topic - Next topic

कदम


बरं झालं
मला कळली नाही
प्रेमाची एकही ओळ
नाहीतर हृदयात उठला;असता जाळपोळ

बरं झालं
मला कळली नाही
प्रित कुणाच्या मनाची
नाहीतर कळाली असती मला;रित जगाची

बरं झालं
मला कळत नाही
प्रेमाची कसली भाषा
नाहीतर झाली असती;ईतरांसारखीच दुर्दशा

बरं झालं
मला कळला नाही
प्रेमातील एकही ईशारा
नाहीतर विसरून गेलो असतो;फुलवायचा पिसारा