*** प्रेम कविता ***

Started by धनराज होवाळ, October 27, 2017, 07:09:01 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


❤📝 #प्रेम_कविता 📝❤

खरंच कोणीतरी असावं सोबती,
आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला..
सोबती शिवाय अर्थच काय,
आपल्या या एकटं जगण्याला..!!

माझं तर जीवनच सार्थक झालं,
कारण तु माझ्या आयुष्यात भेटलीस..
फक्त भेटलीसच कसं म्हणू मी,
तु तर हृदयालाच माझ्या खेटलीस..!!

तुझ्या प्रितीच्या तराण्यात,
हृदयातला शब्द मी गुंफतो..
तु करते कविता मजषर अन,
मग मस्त त्यात मी रमतो..!!

एकमेकांवर अनंत जीव लावण्याची,
आपली जन्मोजन्मीची प्रित आहे..
शब्दांतुन प्रेम व्यक्त करण्याची,
आपली एक वेगळीच रीत आहे..!!

प्रेमाच्या या कवितेला,
तुझ्या प्रितीचा गंध असतो...
प्रेमनगराच्या त्या बागेत,
तुझ्या कुशीत मी गुंग असतो...!!!
-
👼 #प्रेमवेडा_राजकुमार )
( #धनराज_होवाळ )
कुंडल, जि. सांगली
मो. ९९७०६७९९४९.
🙏🏻💐📝❤🤴🏻❤📝💐🙏🏻