तू असूनही मी आज पोरका आहे

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, October 27, 2017, 08:39:52 AM

Previous topic - Next topic
तू असूनही आज मी पोरका आहे
शब्दांच्या दुनियेत मी आज परका आहे

रोज जातेस तू दारातून माझ्या
का तुझ्यासाठी मी मुका आहे

जवळून जातेस फिरून एकदा पाहशील
म्हणून आजही मी रस्त्यात उभा आहे

काटे टोचतात रोज मला
जेव्हा प्रेमाचा बांधतो झोका आहे

हृदयाचे ठोके चुकतात रोजचं
जीवंतपणीचं मरण्याचा तो शाप आहे

काटे घड्याळाचे रोज फिरतात उलटे
जेव्हा तुझ्या येण्याची वाट अधुरी आहे

अंगणातील सड्यावर मी आजही
परक्या सारखा नेहमीचं उभा आहे

रांगोळीच्या रंगात आजही चमकणारा
तो मी अनोळखी दिवा आहे

प्रेमाच्या सावलीतं आधार शोधणारा
अनोळखी मी वाटसरू आहे

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर