आश्वाशनाची खापर

Started by amoul, February 05, 2010, 12:42:29 PM

Previous topic - Next topic

amoul

जलाशयावर बुडवून घागर,
लचक लचक मदनाचा सागर,
येताच समोर सजना प्रियकर,
लाज झाकती तियेचे उभय कर,
भान हरपते घट कमरेवर,
क्षणात फुटते जलाची घागर.

मग धरते आडोसे कोने,
कित्येक दिसांची सुटती मौने,
साजन कुशीत धरते धरणे,
मज न आता इथे रहाणे,
हेच शेवटचे ऐक गाऱ्हाणे,
पुरे तुझे हे इथवर बहाणे.

म्हणतो काही साजन प्रियकर,
काही दिसांचा आणिक धीर धर,
ढळला पदर तो आधी सावर,
रडू नको तू हुंदका आवर,
झाला उशीर तू आधी गाठ घर,
कित्येक नजरा उभ्या वाटभर.

मग होते ती क्षणात सावर,
बघते घागर असे काठावर,
फुटली घागर किती भयंकर,
त्यात उशीर, डोईवर दिनकर,
निघते मागे पुन्हा झडकर,
आश्वाशनाची निवडून खापर.


.......अमोल

santoshi.world


Sandesh More