शहर

Started by शिवाजी सांगळे, October 31, 2017, 03:45:58 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

शहर

सारेच शहर हे चोरांचे, कोण साव आहे?
लागत नाही जो हाती, त्याचेच नाव आहे!

करा कितीही वल्गना, येथे तुम्ही प्रगतीच्या
थोपटून पाठ स्वतःची, आणला आव आहे!

जयजयकार करून, साम दाम दंड भेदाचा 
युद्धास येथल्या, जिंकण्याचाच डाव आहे!

बळी जाणाऱ्या, सामान्यांच्या भावनेवरती
सत्ताभोगु मुखवट्यांनी, मारला ताव आहे!

कोणास शंका येथे, आमच्या कार्यावरती
पहा रस्त्यांवर येथे, आमचेच नाव आहे!

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९