बघ माझी आठवण येते का ?

Started by archana sawant, February 05, 2010, 03:25:17 PM

Previous topic - Next topic

archana sawant

बघ माझी आठवण येते का ?

आता प्रत्येक तुझा क्षन माझ्या अस्तित्वापासून दूर असेल,
वर वर तू निश्चिंत असचील ........ पण मनात मात्र दुखाचा पूर असेल....
काही दिवसानंतर हा पूर ओसरेल,
कुठल्यातरी बेसावध क्षणी........... पुन्हा पाऊस बरसेल,
पुन्हा कुणीतरी आवडू लागेल........ पुन्हा डोळे झुरतील,
मनात मात्र तुझ्या ................. माझेच उसासे असतील.
वाट बघ... प्रेमाची भावना पुन्हा उफाळून येते का.....?
त्या क्षणी नकळत  का होईना..........बघ माझी आठवण येते का.......?

कदाचित असही होईल....... तुला " स्थळ एखादं सांगून येईल ",
दोन्ही घरची बोलणी होतील....... दोन्हीकडून " होकार "असेल,
घरात जरी ' हो"  म्हटलं तरी..... मनात तुझ्या " नकार" असेल,
पुन्हा मन दुबळ  होईल..... स्वताचीच बाजू मांडायला,
अपयशी ठरला म्हणून 'वेडं'......तुझ्याशीस लागेल भांडायला,
भांडण मिटेपर्यंत... अंगावर हळद चढेल........
आपण नक्की काय करतोय ? तुझ्या मनाला कोड पडेल...
सनईच्या सुरावर... वाजंत्रीच्या तालावर नवीन घरात प्रवेश होईल.....
पायांना माप ओलांडताना मात्र मनाला क्लेश होईल.....
क्लेश होऊ देऊ नकोस..... असेल त्याचा  स्वीकार कर,
" तूझ्यावर  आता जबाबदारी आहे "याचा  विचार  कर...
अंगावरची हळद आता बघ हळूहळू उतरते  का ?
पिवळ्या पाण्याकडे बघताना नकळत.......बघ माझी आठवण येते का....?

दिसा मागून दिस जातील...... वर्षा मागून वर्षे,
नव्या आयुष्यात पुन्हा......नवी नाती निर्माण होतील,
आपला नातं जरा जुनं होईल.... मनसुद्धा सुनं होईल,
माझ्या सुन्या मनात मात्र तूच राहशील..... तू सुद्धा  एक दिवस माझ्यसारखीच झुरशील,

बघ एखादी पाऊलवाट तुला माझ्या आठवणीकडे  न्हेते  काय....?
सुकलेल्या झाडाला पुन्हा नव्याने एकदा पालवी फुटते काय...?
आयुष्याच्या अंतापर्यंत किमान " निखळ मैत्री" तरी उरते काय...?
आणि आयुष्यात एकदा तरी.....

बघ माझी आठवण येते का.......?

nirmala.

#1

apratimmmmm!!!!!!!!!!!
awsooom
khup khup sundar ahe........
manapasun aawdaliiiiii :) :) :) :) :)

Parmita

बघ एखादी पाऊलवाट तुला माझ्या आठवणीकडे  न्हेते  काय....?
सुकलेल्या झाडाला पुन्हा नव्याने एकदा पालवी फुटते काय...?
आयुष्याच्या अंतापर्यंत किमान " निखळ मैत्री" तरी उरते काय...?
आणि आयुष्यात एकदा तरी.....

बघ माझी आठवण येते का.......? khoop chaan ahe

reliancemama

आसे नको ना, लिहूस !!!!!!!!!!आसे नको ना, लिहूस !!!!!!!!!!जळतय रे