मंतरलेला शब्द

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 01, 2017, 11:14:47 AM

Previous topic - Next topic
मंतरलेला शब्द
तो ठाव नवे घेई
उसनं वारी का व्हायना
डोळ्यांचे भाव पाही

हृदयाच्या ठोक्यात
नेहमीचं नावं तुझे
ओळखले नाहीस
तू कधी भाव माझे

पाऊले ही पुन्हा पुन्हा
येतात फिरुनी मागे
दिसत नाहीस तू कुठे
होतात फक्त भास तुझे

दुःखाच्या या गर्तेत
दंगला हा देह सारा
कधीच भेटला नाही
मज प्रेम सुखाचा वारा

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर

Hemlatapr

खूप छान भावनात्मक कविता आहे  अमोल दादा तुमची.....

Shrikant R. Deshmane

हृदयाच्या ठोक्यात
नेहमीचं नावं तुझे
ओळखले नाहीस
तू कधी भाव माझे
Khup chan ahe
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]