कधींच ना सोबत देणार

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 02, 2017, 06:49:08 AM

Previous topic - Next topic
दूर देशी का मनी भाव तुझे अडगळीतला
देव तो का देवाला त्या घालू मी साकडे

रोज भल्या पहाटे किलबिल पक्षांची
घेता कानोसा मग वाट मज खुनावते

काटेरी वनातून दिसशील  मज तू
कस्तुरीच्या हरणापरी मृगजळचं गं तू कधी नं भेटणार

चंदना परी दुरूनच तू सुगंध देणार
आभाळीच इंद्रधनू तू फक्त सप्तरंगात शोभून दिसणार

रातीच्या कुट्ट अंधारात दिव्याला साथ देणारा
पतंग गं तू कधींच ना शेवटी सोबत देणार

रिमझिम पावसाची सर गं तू
फक्त ओल मातीला देणार

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील)
मो.9637040900.अहमदनगर

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]