खूप आठवण येतेय तुझी मला.....

Started by Vaibhav3799, November 03, 2017, 05:56:19 PM

Previous topic - Next topic

Vaibhav3799

असे का, कशासाठी होते ते समजतच नाही पण,
खूप आठवण येतेय तुझी मला.....
क्षणभर देखील तुझ्याशिवाय जगणे मुश्कील आहे,
प्रत्येक क्षणी, खूप आठवण येतेय तुझी मला.....

खूप प्रेम करतो ग मी तुझ्यावर, अगदी जीवापाड,
कितीही वेळ तुझ्याशी बोलेल तितकं कमीच वाटत
नेहमी तुझीच ओढ लागलेली असते या वेड्या मनाला
आता तुच सांग, कशी समजूत काढू मी माझी स्वतःला ?
खरंच, खूप आठवण येतेय तुझी मला.....

भले हि अंतराने का दूर असेनास,
माझ्याशी मनाने नेहमीच तू जवळ आहेस..... अन असेच राहणार,
सगळं माहित आहे मला कि तू माझी नाही आहेस,
सगळं कळतंय पण वळतच नाही, कसे सांगू बाळा तुला
खरंच, खूप आठवण येतेय तुझी मला.....

खूप स्वप्ने रंगवली आहेत मी तुझ्यासोबत ,
त्याच्याकडे हेच मागणे आहे की, नजर ना लागो
कोणाची या आपल्या सुंदरश्या नात्याला,
खूप सुंदर वाटतय जीवन तुझ्यासोबत असताना,
तुझ्याविना काडीमोलाचा हि अर्थ नाही उरणार या जगण्याला, 
खरंच....!! कसे सांगू , खूप खूप खूप खूप आठवण येतीय तुझी मला....   

जाता जाता इतकेच मागतो,
हे देवा नेहमी सुखी आणि खूष ठेव रे माझ्या ( बाळाला ) प्रेमाला....

                                                                             
                                                                                  तुझाच.....







Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]