बरे झाले देवा

Started by Asu@16, November 05, 2017, 11:08:03 PM

Previous topic - Next topic

Asu@16

बरे झाले देवा

बरे झाले देवा
नाही झाले फूल
रूपगंधात गुल अन्
साऱ्या आयुष्याची धूळ
बरे झाले देवा
नाही झाले खग
स्वच्छंदाची रग अन्
साऱ्या आयुष्याची तगमग
बरे झाले देवा
नाही झाले वारा
सर्वत्र पसारा अन्
सारं आयुष्य आवारा
बरे झाले देवा
झाले मी मानव
विश्वाची कणव आणि
साऱ्या आयुष्याची जाणीव

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita