पुन्हा मागे येणारा सोडून गेला

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 07, 2017, 06:25:38 AM

Previous topic - Next topic
तुझ्या अस्तित्वाला आज का तडा गेला
दुरूनच का तो चंद्र दिसेनासा झाला

त्या वळणावर आज ही उभा आहे
जिथं पुन्हा मागे येणारा सोडून गेला

का उगा भांडू हृदयाशी
जो आपला तो आज नातं तोडुन गेला

हा संसार होता सारीपाटाचा डाव
का हा डाव आपला तो मोडून गेला

ओठांवरच्या रसात निपचित
पडलेला श्वास का रोखून गेला

विरहाच्या मिलनाचा तो दिवस
महिन्याच्या वाटेवर जोडून  गेला

नशा झाली होती प्रीतीची तो
नशेचा श्वास का गोठून गेला

एकमेकांच्या भेटीचा तो आनंद
या दुनिये समोर पाडून गेला

जाता जाता स्वप्नांना दुःखाचा
शेवटी निरोप धाडून गेला

तो एक दिवस येणार होता
आपला जो शेवटी कायमचा मारून गेला

विरहाच्या निखाऱ्यावर का
शेवटी हा देह जळून गेला

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]